11
| जिल्हा स्तरावर असणाऱ्या निधी मधून ग्रामपंचायतीस विकास कामासाठी कर्ज घेता येईल. कर्ज घेण्यासाठी ग्रामपंचायतीने विहित नमून्यातील अर्जासोबत आवश्यक असलेली रक्कम, कर्ज घ्यावयाचे कारण, खर्चाचा अंदाज, त्याची व्यवस्था ठेवण्यासाठी येणारा खर्च, कर्ज परतफेड करावयाची मुदत व हप्त्यांची संख्या इत्यादी माहिती ग्रामपंचायतीच्या मासिक ठरावाद्वारे मंजूरी घेऊन प्रस्ताव जिल्हा परिषदेस सादर करावा. अंदाजपत्रकाचे २५ टक्के रक्कम ग्रामनिधी खात्यात असणे आवश्यक आहे. कर्ज प्रस्तावासोबत पूर्वीच्या वर्षाच्या अखेरीस असलेली शिल्लक पासबुकाच्या झेरॉक्स सह दर्शविण्यास आली पाहिजे. मागील तीन वर्षाचे जमा व खर्चाचे अहवाल, चालू आर्थिक वर्षाचे व पुढील दोन वर्षाचे अंदाजपत्रक, अंदाजे उत्पन्नातून कर्जाची परतफेड करावयाचे ठरविले असल्यास त्याचे विवरणपत्र प्रस्तावासोबत सादर करणे आवश्यक आहे. स्थायी समिती अर्जाची तपासणी करुन कर्ज घेण्याचा उद्देश, पंचायतीची आर्थिक स्थिती, कर्ज फेडण्याची क्षमता इत्यादी बाबींचा विचार करुन कामाचे अंदाजपत्रकीय रकमेच्या ७५% एवढी रक्कम कर्ज म्हणून मंजूर करेल. कर्ज परतफेड २० वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठीची नसावी.कर्जासाठी द.सा.द.शे ५% व्याजदर राहील.कर्ज फेडण्याचे सरपंच / उपसरपंच व पंचायतीचे अधिकृत केलेले कोणतेही दोन सदस्य यांनी विहित नमून्यातील हमीपत्र लिहून दिले पाहिजे.ग्रामपंचायत ज्या कालावधीत कर्ज परतफेड करणार असेल त्या कालावधीच्या वार्षिक अंदाजपत्रकात कर्ज हप्ता परतफेड करण्यासाठी तरतूद केलेली पाहिजे.या निधी अंतर्गत उत्पादक स्वरुपाची विकास कामे घेण्यात यावी.कर्जाचा प्रस्ताव तयार करताना महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (जिल्हा ग्राम विकास) निधी नियम, १९६० मधील नियम १० नुसार प्रस्ताव तयार करण्यात यावा. | ||||
| ग्रामविकास विभाग शासन निर्णय क्रमांक:- क्र.व्हीपीएम2601/प्र.क्र.1643/22, दिनांक:- 16-05-2002 | जिल्हा ग्रामविकास नीधीच्या गुंतवणूकी बाबत. | मुंबई जिल्हा ग्राम विकास निधी नियम, १९६० चे कलम ५ अन्वये जिल्हा ग्राम विकास निधीमधील रक्कमा गुंतविणे व पुन्हा गुंतविणेबाबत तरतूद करण्यात आलेली आहे. तथापि, सदर गुंतवणूक योग्य प्रकारे होत नसल्यामुळे दिनांक २२ नोव्हेंबर, २००० तसेच, दिनांक ८ जानेवारी, २००२चे समक्रमांकाचे परिपत्रकान्वये सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. | ||
| २. उपरोक्त सूचनांमध्ये जिल्हा ग्राम विकास निधीमधील मागील तीन वर्षाच्या सरासरी Withdrawls च्या दीडपटीपेक्षा जास्त रक्कमा Saving Accounts मध्ये रहाणार नाहीत याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याबाबत पुर्नविचार करुन शासनाने असा निर्णय घेतला आहे की, जिल्हा ग्राम विकास निधीमधील सर्व शिल्लक रक्कम Saving Accounts मध्ये न ठेवता त्यापैकी जास्तीत जास्त रक्क्म जिल्हा ग्राम विकास निधी नियम, १९६० चे कलम ५ मधील तरतूदीनुसार ३० ते ४५ दिवसाच्या किंवा अधिक कालावधीच्या निश्चित ठेव योजनेत गुंतवावी आणि त्यापासून मिळणारे उत्पन्न आणि मूळ रक्कमा अशाप्रकारे गुंतवाव्यात की, ज्यायोगे शासनाला अधिकाधिक उत्पन्न मिळू शकेल आणि व्याजाची हानी होणार नाही. याबाबत जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने सदर रक्कम गुंतवितांना त्यासाठी ग्रामपंचायतींना कर्जासाठी आवश्यक ती रक्कम तत्काळ उपलब्ध होईल नेही तारतम्याने ठरवावे. | ||||